नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे. त्यांनी आपल्या जुळ्या मुलांचा प्रवेश शहरातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, टोकरतलाव येथील अंगणवाडीत केला आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुलांच्या प्रवेशासाठी त्या स्वतः शाळेत गेल्या, त्यावेळीचा त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.