
ओढ्यावर आलेल्या पाण्यातून शेताकडे जात असताना दोन इसम वाहून गेल्याने एकाचा मृत्यू झाला आहे.तर एकजण बचावला असल्याची घटना घडली आहे.
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात रात्री दोन वाजता झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. तेरणा मांजरा नदी काढासह शेतशिवारातील संपूर्ण खरीप पिके कंबरेएवढ्या पाण्यात आहेत. रविवारी पहाटे झालेल्या धुंवाधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात ओढ्यांना पूर अला असून सकाळी 9 वाजता तालुक्यातील काटेजवळगा केदापूर रस्त्यावर शेताकडे जाताना वैजनाथ राजमाने वय 35 वर्षे व दयानंद संभाजी बोयणे वय 40 वर्षे हे दोघे हाताला धरून ओढ्याच्या पाण्यातून गाय घेवून जात होते. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पुराच्या पाण्यात वाहून गेले तर यात दयानंद बोयणे या व्यक्तीचे प्राण वाचवण्यात शेतकऱ्याना यश आले आहे. तर वैजनाथ राजमाने हे सकाळपासून बेपत्ता होते. गावातील अनेक नागरिक व एनडीआरफच्या कर्मचाऱ्यांनी बेपत्ता व्यक्तीचा शोध घेतला असता त्यांचा मृतदेह सापडला आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी भाऊ भावजय असा परिवार आहे. निलंगा पोलिसानी घटनास्थळाचा पंचनामा करून उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी हूग्गे यानी शेवविच्छेदन करून प्रेत अंत्यविधीसाठी नातेवाईकाच्या ताब्यात दिले आहे. निलंगा ते शिरोळ वांजरवाडा गाडी सकाळपासून पुलावर पाणी आल्याने थांबून आहे. ओढ्यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात थांबल्याने प्रवाशाना ताटकळत थांबावे लागले आहे.