
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) 28 सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली असून ही परीक्षा आता 9 नोव्हेंबरला होणार आहे. विदर्भ, मराठवाडय़ासह राज्याच्या अनेक भागांत अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुरामुळे विविध जिह्यांमध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शिवाय पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे उमेदवारांना परीक्षा पेंद्रावर पोहोचण्यास कसरत करावी लागण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून आयोगाकडे परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विनंती अर्ज केला होता.
37 जिह्यांत 524 उपकेंद्रे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडूक घेण्यात येणारी परीक्षा राज्यात 37 जिह्यांमधून 524 उपपेंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेकरिता राज्यातून 1 लाख 75 हजार 516 विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. मात्र पूरजन्य परिस्थितीमुळे हे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.