
‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक श्री निवासन सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागी सोनिया सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे बिघडलेली आर्थिक स्थिती आणि सर्वच पातळय़ांवर कारभार घसरलेल्या ‘बेस्ट’ला अखेर पूर्णवेळ महाव्यवस्थापक मिळाला आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बेस्टचा प्रभारी कारभार पाहणारे एस. व्ही. आर. श्रीनिवास सेवानिवृत्त झाल्यानंतर अंतरिम व्यवस्था म्हणून पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा यांच्याकडे ‘बेस्ट’चा तात्पुरता कार्यभार महिनाभरापूर्वी सोपवण्यात आला होता. त्यामुळे पूर्णवेळ महाव्यवस्थापकपदी कधी नियुक्त होणार असा प्रश्न विचारला जात होता. अखेर पूर्णवेळ महाव्यवस्थापक म्हणून सेठी यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला आहे.