अर्थवृत्त – संपूर्ण जगावर कर्जाचा डोंगर

जगातील प्रत्येक व्यक्तीवर 36 लाखांचे कर्ज

जागतिक अर्थव्यवस्थेवर कर्जाचे मोठे संकट ओढावले आहे. इन्स्टिटय़ूट ऑफ इंटरनॅशनल फायनान्स (आयआयएफ) च्या तिमाही अहवालानुसार, दुसऱया तिमाहीपर्यंत ग्लोबल कर्ज 337.7 ट्रिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 30 हजार लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. जर या कर्जाला जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 8.24 अब्जांमध्ये वाटले तर प्रत्येक व्यक्तीवर 36.34 लाख रुपयांचे कर्ज असेल. या वर्षी ग्लोबलमध्ये सर्वात जास्त फायदा चीन, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन आणि जपानला झाला. डॉलरची घसरण आणि विविध बँकेकडून व्याजदरात करण्यात आलेल्या कपातीमुळे कर्जात वाढ झाल्याचे आयआयएफच्या अहवालात म्हटले आहे. दुसऱया तिमाहीत एकूण कर्जात 3.4 ट्रिलियन डॉलरची वाढ झाली आहे. हे 109 ट्रिलियन डॉलरहून अधिक रेकॉर्डवर पोहोचले आहे.

मॉनिटर पॉलिसी धोक्यात

या रिपोर्टमध्ये अमेरिकेच्या कर्जावरही चिंता व्यक्त केली आहे. शॉर्ट टर्म लोनवर वाढणारी अवलंबता ही केंद्रीय बँकांवर व्याजदर कमी राखण्यासाठी दबाव निर्माण करू शकते. यामुळे मॉनिटर पॉलिसीचे स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकते. जपान, जर्मनी आणि फ्रान्स यांसारख्या देशांत आर्थिक दबाव वाढू शकतो. गुंतवणूकदारांना बॉण्ड विजिलेंट राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दादरमध्ये वामन हरी पेठे ज्वेलर्सचे नवे शोरूम

n वामन हरी पेठे ज्वेलर्सची ब्रँड ऍम्बेसिडर आणि बॉलीवूडची उदयोन्मुख स्टार शर्वरी हिच्या हस्ते दादरमध्ये नूतनीकरण केलेल्या वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या शोरूमचे उद्घाटन करण्यात आले. दादरच्या रानडे रोडवरील या नव्या शोरूमचा लोकार्पण सोहळा नुकताच आनंद आणि उत्साहात पार पडला. या वेळी वामन हरी पेठे ज्वेलर्सने नावीन्य नवरत्न कलेक्शन लाँच केले. या वेळी वामन हरी पेठे ज्वेलर्सचे आशीष पेठे उपस्थित होते. मागील 75 वर्षांपासून आम्ही या शोरूमद्वारे ग्राहकांची सेवा करत आहोत, असे आशीष पेठे म्हणाले.

होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पोत घरांची मागणी

n मुंबईत नुकताच आयोजित करण्यात आलेल्या होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो 2025 मध्ये 500 नवीन रियल इस्टेट प्रोजेक्टचे अनावरण करण्यात आले. हे जवळ जवळ 1 लाख कोटी रुपये मूल्यांचे आहे. दिवाळी सीझनमध्ये 1.35 ते 1.40 लाख घरांची विक्री होईल, असा अंदाज आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, नागपूरसह आजूबाजूच्या शहरांत 500 नवीन प्रोजेक्ट लाँच केले जाणार आहेत. यात खरेदीदारांना काही ऑफर्स मिळतील. यामध्ये स्टॅम्प डय़ुटी, रजिस्ट्रेशन नोंदणी आणि कमी दरात गृहकर्ज यांचा समावेश आहे.

पैसाबझारचे एफडीबाँड्स लॉन्च 

n पैसाबझारने एफडी आणि कॉर्पोरेट बाँड्स लॉन्च केले. पैसाबझारवर ग्राहक आता फिक्स्ड इनकम इन्स्टमेंट्समध्ये गुंतवणूक करून 13.25 टक्क्यांपर्यंतचा परतावा मिळवू शकतो. पैसाबझारने आपल्या प्लॅटफॉर्मवर फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) ची सुरुवात केली आहे. त्याचबरोबर कंपनीने सेबी-रेग्युलेटेड संस्थेसोबत भागीदारी करून कॉर्पोरेट बाँड्समध्ये गुंतवणुकीची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. 

करिष्माची नवी अगरबत्ती बाजारात  

n बंगळुरू येथील करिष्मा प्रोडक्टसने प्युअर ब्रँडची नवी अगरबत्ती ऊद वूड आणि बकुर नॅचरल बेस अगरबत्ती बाजारात आणली आहे. या अगरबत्त्या नैसर्गिक वनस्पतींपासून तयार केल्या आहेत. तसेच या अगरबत्तीला नैसर्गिक सुगंध आहे. अगरबत्ती 50 ग्रॅम, 100 ग्रॅम आणि 250 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. कंपनीच्या अगरबत्त्या विविध प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. बंगळुरू कंपनीचा लोगो पाहूनच अगरबत्ती खरेदी करावी. अधिक माहितीसाठी संपर्क – 9343834805

ओरा कनेक्टेडहा उपक्रम सुरू

n सेल्सफोर्स आणि ओरा फाईन ज्वेलरी यांनी ‘ओरा कनेक्टेड’ हा उपक्रम सुरू करण्यासाठी भागीदारीची घोषणा केली. ‘ओरा कनेक्टेड’मध्ये एजेंटफोर्स, सेल्स क्लाऊड, सर्व्हिस क्लाऊड, मार्केटिंग क्लाऊड आणि टॅब्लॉ यांचा समावेश आहे. ओरा नव्वदहून अधिक स्टोअर्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरून मिळालेल्या तीस लाखांहून अधिक ग्राहकांचा डेटा एकत्र करून उपयोज्य आकलन प्रदान करते.