
तृतीयपंथी समाजासाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी राज्य सरकारने 11 लाख 50 हजारांचा निधीची तरतूद केली.तृतीयपंथी समाज हा समाजातील एक दुर्लक्षित घटक असल्याने त्यांचा सामाजिक प्रवाहामध्ये सहभाग वाढवण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून तृतीयपंथी समाजाचे सशक्तीकरण व मुख्य प्रवाहात समावेश साधण्याचा प्रयत्न आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. निधीचा वापर राज्यस्तरीय नाटय़, नृत्य, संगीत महोत्सव, कला संमेलन, तसेच इतर सांस्कृतिक उपक्रमासाठी करण्यात येईल.



























































