
कुंडीतील तुळशीच्या रोपाची बरेचदा योग्य पद्धतीने वाढ होत नाही. रोपाची योग्य ती काळजी घेऊनदेखील ते कोमेजून जाते. तुळशीचे रोप कुंडीत लावताना भरपूर पोषक तत्त्व असलेल्या मातीची निवड करा. तुळशीच्या रोपाला दर 15 दिवसांनी शेणखत घालावे.
वापरलेली चहा पावडर सुकवून मातीत मिसळावी. यामुळे मातीतील मिनरल्सचे प्रमाण वाढून तुळशीच्या रोपाची वाढ चांगली होते. केळ्याच्या सालींचे लहान लहान तुकडे करून मातीत मिसळावेत. केळ्याच्या सालीत पोषक तत्त्व आणि पोटॅशियम असते. तुळशीच्या रोपाला भरपूर ऊन मिळणे खूप गरजेचे आहे.