आश्रमात काळे धंदे करणाऱ्या चैतन्यानंद बाबाला अटक

दिल्लीत काळे धंदे करणारा स्वयंघोषित बाबा स्वामी चैतन्यानंद सरस्वती ऊर्फ पार्थसारथी याला आज आग्रा येथून अटक झाली. 17 विद्यार्थिनींनी त्याच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते.

वसंत पुंज येथील आश्रमातील अवैध प्रकार काही विद्यार्थिनींनी उघडकीस आणले होते. त्यांनी 62 वर्षीय स्वामी चैतन्यानंद सरस्वती बाबावर विद्यार्थिनींशी गैरवर्तन आणि छेडछाडीचा आरोप केला होता.  गुन्हा दाखल झाल्यावर स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार झाला होता. तसेच त्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी त्याने न्यायालयात अर्जदेखील दाखल केला होता, मात्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. तो देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी लुकआऊट नोटीसदेखील जारी केली होती. त्यानंतर रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास आग्रा येथील एका हॉटेलमधून चैतन्यानंद सरस्वतीला पोलिसांनी अटक केली आहे.