कोरियन मुलींसारखे सुंदर केस हवे असतील तर, ‘हा’ हेअर पॅक नक्की करुन बघा

घनदाट आणि लांब केस स्त्रियांच सौंदर्य खुलवतं. त्यामुळे आपलेही केस घनदाट असावेत अस सर्वांनाच वाटत. कोरियन स्त्रियांचे केस लांब,घनदाट, मऊ आणि चमकदार असतात. याच कारण म्हणजे ते करत असणारे नैसर्गिक उपाय. तेच उपाय आपण बघूया. स्वस्थ केसांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केसांची त्वचा. केसांच्या मुळापासून आपण सुरुवात केली तर केसांची त्वचा ही फार महत्त्वाची मानली जाते.

आहारात काकडीचा समावेश करणे हे वरदानापेक्षा कमी नाही, वाचा

कोरियन पॅक मध्ये ग्रीन टी,कोरफड आणि अंडी यासारखे पदार्थांचा समावेश असतो. हे सर्व घटक आपल्या केसांसाठी फार महत्त्वाचे मानले जाते.

केसांचा हा मास्क कसा तयार कराल?

१ अंडं
२ मोठे चमचे कोरफड जेल
१ मोठा चमचा नारळाचे तेल
१ छोटा चमचा शतावरी पावडर
याची पेस्ट करुन केसांना लावावी.

निरोगी राहण्यासाठी ‘या’ एका पदार्थाचा समावेश आपल्या आहारात रोज असायलाच हवा, वाचा

घरगुती उपाय
कोरियन पॅक मध्ये विशेष करुन नैसर्गिक गोष्टींचा वापर केला जातो.

कोरफडीमुळे स्काल्पमध्ये ओलावा टिकून राहण्यास मदत होते. आणि केसांतला कोंडा कमी होण्यास मदत होते.

अंड्यामधे भरपूर प्रोटीन असल्यामुळे केसांना मजबूत करुन केसांच्या वाढीसाठी मदत करतं.

नारळाचे तेल केस गळती थांबवून त्यांना चमक मिळवून देतं. तसंच शतावरी केसांची गळती थांबवून केसांना भरपूर पोषण देतं. मुख्य म्हणजे केस स्वच्छ धुवून घ्यावेत. नीट सुखवून हा हेअर पॅक स्काल्प आणि केसांना कमीत कमी ३० मिनिटे लावून ठेवावा. नंतर केस थंड पाण्याने धुवावे.

हा उपाय केल्याने आठवड्याभरात तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल.