म्हाडाच्या 5354 घरांची सोडत 11 ऑक्टोबरला, स्वीकृत अर्जांची यादी आज

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5354 घरांच्या आणि सिंधुदुर्ग जिह्यातील ओरोस, कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंड विक्रीकरिता आयोजित सोडतीसाठी मंडळातर्फे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नव्या वेळापत्रकानुसार सोडत आता 11 ऑक्टोबरला ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहात होणार आहे.

सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी उद्या, बुधवारी सायंकाळी 6 वाजता ‘म्हाडा’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. सोडतीसाठी पात्र अर्जदारांची अंतिम यादी 9 ऑक्टोबरला प्रसिद्ध केली जाणार आहे.