10 रुपयांत गणवेशची विक्री, पाकव्याप्त कश्मीरात सैन्याची उडवली खिल्ली

पाकव्याप्त कश्मीरमध्ये काही दिवसांपासून पाकिस्तान सरकारविरोधात निदर्शने सुरू आहेत. शेकडो लोक रस्त्यावर उतरून गोंधळ घालत आहेत. तिथली परिस्थिती भयावह आहे. पाकिस्तानी सैन्याने त्यांच्यावर गोळीबार केला आहे, पण तरीही निदर्शने सुरूच आहेत. लोक मागे हटायला तयार नाहीत. अशा गदारोळात निदर्शक पाकिस्तानी लष्कराची खिल्ली उडवत आहेत. पाकिस्तानी लष्कराचा गणवेश, हेल्मेट आणि इतर उपकरणे फक्त 10 रुपयांना विकली जात असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्या भागात निदर्शने सुरू आहेत, तेथील हा व्हिडीओ आहे. व्हिडीओच्या माध्यमातून पाकिस्तानी लष्कराला अपमानित करण्याचा प्रकार घडत आहे.

पाकिस्तानच्या पीओकेमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांनी पाकिस्तानातील शाहबाज सरकारला हादरवून सोडले आहे. निदर्शक 38 मागण्यांवर ठाम आहेत, यामध्ये पीओके विधानसभेत पाकिस्तानात राहणाऱ्या कश्मिरी निर्वासितांसाठी राखीव असलेल्या 12 जागा रद्द करणे समावेश आहे.