
महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) ने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करून 79 कोटी 5 लाखांचे कोकेन जप्त केले. कोकेन तस्करी प्रकरणी दोन महिलांना अटक केली. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रग तस्करीचे प्रकार होऊ नये याची खबरदारी संबंधित यंत्रणांनी घेतली आहे. बँकॉक येथून दोन प्रवासी हे ड्रग घेऊन येणार असल्याची माहिती डीआरआयच्या युनिटला मिळाली. त्या माहितीची सत्यता पडताळली. त्यानंतर डीआरआयच्या पथकाने विमानतळावर सापळा रचला. नुकत्याच दोन महिला बँकॉक येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्या. त्या दोघींच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. त्यामुळे त्या दोघीना थांबवले. त्यांच्या साहित्याची तपासणी केली. त्यानी खेळण्याच्या पाकिटामध्ये कोकेन लपवले होते. एनडीपीएस कायद्यानुसार त्या दोघींचा जबाब नोंदवून घेतला. त्या दोन्ही महिलांना अटक केली. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.