
अमेरिकेहून हिंदुस्थानात निर्यात केल्या जाणाऱ्या कच्च्या तेलामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात सरासरी 40 टक्के घसरण झाली आहे. अमेरिकेहून एलएनजीचे आयातीत मागील वर्षभराच्या तुलनेत 41 टक्के घसरण झाली आहे. तसेच मासिक आधारावर 23 टक्के घसरली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अमेरिकेहून कच्च्या तेलाची निर्यात सरासरी 2.20 लाख बॅरल प्रतिदिन झाली. तर जुलै महिन्यात ती 3.64 लाख टन बॅरल प्रति दिन होती. सप्टेंबरमधील आयात वार्षिक आधारावर 30 हजार बॅरल प्रतिदिन कमी होती. तर मासिक आधारावर ती 23 हजार बॅरल प्रति दिन होती, असे मेरीटाइम इंटेलिजेन्स एजन्सी केप्लरने म्हटले आहे. ऑगस्ट, सप्टेंबरची ऑर्डर ही जुलै किंवा ऑगस्टमध्ये दिली जाते. वर्षभरापूर्वी अमेरिकेतून आयात होणारी एलएनजीचा पुरवठा हा 4.6 लाख टनने कमी होऊन 2.7 लाख टन झाला होता. तर ऑगस्टमध्ये 3.5 लाख टन झाला आहे.
तेल आयात करताना हिंदुस्थान आर्थिक गणित पाहून निर्णय घेतो, असे केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी म्हटले. तर केंद्रातील मोदी सरकार आगामी वर्षात अमेरिकेसोबत तेल उत्पादनांच्या व्यापाराचा विस्तार करण्याच्या विचारात आहे, असे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले होते.
फेस्टिव्ह कलेक्शन
n आदित्य बिरला ग्रुपच्या ‘इंद्रिया’ने आपल्या नव्या ‘अल्का’ कलेक्शनसह फेस्टिव्ह सीझनच्या उत्साहात भर घातली आहे. ‘दिल अभी भरा नही’ या गाण्याची पुनर्निर्मिती करून या म्युझिक व्हिडीओद्वारे हे कलेक्शन सादर करण्यात आले. यात प्रथमच अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ एकत्र स्क्रीनवर झळकले आहेत.
रोबोट यात्रा
n स्वदेशी विकसित सर्जिकल रोबोटिक सिस्टम तयार करणारी कंपनी एसएस इनोव्हेशन्स इंटरनॅशनलची मेड इन इंडिया सर्जिकल रोबोट यात्रा मुंबईत दाखल झाली. दोन दिवसीय कार्यक्रमाची सुरुवात मंत्राम मोबाईल सिम्युलेशन बसमध्ये आयोजित हँड्स-ऑन रोबोटिक सर्जरी कार्यशाळेने झाली.
एका मोबिलिटी
n एका मोबिलिटी या आघाडीच्या इलेक्ट्रिक व्हेइकल व तंत्रज्ञान कंपनीने राजस राइडसोबत सहयोगाने मुंबईमध्ये आपल्या नवीन डिलरशिपच्या उद्घाटनाची घोषणा केली. 6,000 चौरस फूट जागेवर पसलेल्या या डिलरशिपमध्ये भारतातील इलेक्ट्रिक कमर्शियल व्हेइकल्सची सर्वात मोठी श्रेणी पाहायला मिळते.
व्होल्वोची ईएक्स30 ईव्ही कार लाँच
n व्होल्वो कार इंडियाने आपली नवीन इलेक्ट्रिक कार व्होल्वो ईएक्स 30 कार लाँच केली आहे. या कारची सुरुवातीची एक्सशोरूम किंमत 41 लाख रुपये आहे. परंतु, कंपनी या कारला फेस्टिव्ह सीजनमध्ये 19 ऑक्टोबर 2025 पर्यंत 39,99,000 रुपयांना विक्री करणार आहे. नोव्हेंबर 2025 च्या पहिल्या आठवडय़ापासून या कारची डिलिव्हरी सुरू होईल. हिंदुस्थानात ईएक्स 30 व्होल्वोचे हे तिसरे ईव्ही मॉडल असून ते कंपनीच्या होसकोटे, बंगळुरू येथील कारखान्यात तयार करण्यात आले आहे.
आशीर्वादचे प्रोटीनयुक्त पीठ
n आशीर्वादने ‘आशीर्वाद हाय प्रोटीन पीठ’ बाजारात आणले. हे नवे उत्पादन गव्हाबरोबरच विचारपूर्वक निवडलेल्या मिश्रणातून बनवले गेले आहे ज्यामध्ये 10 टक्के सोया (संपूर्ण प्रोटीनचा स्रोत), हरभरा डाळ आणि ओट्स यांचा समावेश आहे. या आटय़ात 100 ग्रॅममध्ये 15 ग्रॅम प्रोटीन मिळतात आणि तरीही पोळीची चव व मऊपणा तसाच टिकून राहतो.
करिष्माची नवी अगरबत्ती बाजारात
n बंगळुरू येथील करिष्मा प्रोडक्ट्सने प्युअर ब्रँडची नवी अगरबत्ती हरि पानडी आणि विरा मसाला अगरबत्ती बाजारात आणली आहे. या अगरबत्त्या नैसर्गिक वनस्पतीपासून तयार केल्या आहेत. तसेच या अगरबत्तीला नैसर्गिक सुगंध आहे. अगरबत्ती 50 ग्रॅम, 100 ग्रॅम आणि 250 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – 9343834805
महाराजाची लव्हेंडर अगरबत्ती बाजारात
n महाराजा अगरबत्तीची काश्मिरी आणि प्युअर बकुर प्युअर ब्रँडची अगरबत्ती बाजारात आली आहे. ही अगरबत्ती 50 ग्रॅम, 100 ग्रॅम आणि 250 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. रघुनाथ निवास, डी. व्ही. देशपांडे मार्ग, शिवाजी पार्क रोड क्रमांक 4, दादर येथे उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 8369185071 वर संपर्क साधा.