निवडणूक तयारीसाठी काँग्रेसची आजपासून नागपूरमध्ये कार्यशाळा

राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली असून निवडणूक तयारीचा भाग म्हणून पक्षाने पदाधिकाऱ्यांसाठी नागपूर येथे उद्यापासून (शनिवार) दोन दिवस विचारमंथन कार्यशाळेचे आयोजन केले आहे.  कार्यशाळेचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष  हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते होईल

या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी शहरी प्रश्न, सक्रियता आणि राजकारण या विषयावर विवेक वेलणकर तर आजचे बदलते शहरी राजकारण आणि आपण, या विषयावर आशुतोष शिर्पे मार्गदर्शन  करतील. घरपट्टय़ांची चळवळ या विषयावर संवाद आणि शहरांसाठी भविष्यातील कार्यक्रम या मुद्दय़ांवरही चर्चा होणार आहे. दुसऱ्या दिवशी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार आणि माजी मंत्री डॉ. नितीन राऊत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. शहरातील सांस्कृतिक राजकारण, शहरी नॅरेटीव आणि लोकसंवादातून लोकचळवळ यावरही कार्यशाळेत चर्चा होईल.