
खराब हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा तीन दिवसांसाठी बंद राहणार आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने 5 ते 7 ऑक्टोबरपर्यंत स्थगित करण्यात आली असून 8 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होईल, असे वैष्णोदेवी मंदिर व्यवस्थापन समितीने सांगितले. हवामानाची स्थिती कायम राहिल्यास स्थगिती आणखी वाढवण्यात येईल असेही मंदिर समितीने नमूद केले.
भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून माता वैष्णोदेवी मंदिर व्यवस्थापन समितीने यात्रा तीन दिवसांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. माता वैष्णोदेवी यात्रा मार्गावर 26 ऑगस्ट रोजी झालेल्या भूस्खलना 34 भाविकांचा मृत्यू झाला होता तर 22 जण जखमी झाले होते. ही दुर्घटना लक्षात घेत हवामान खात्याकडून इशारा मिळताच श्राइन बोर्डाने यात्रा तात्काळ थांबवली आहे.