भाईंदरजवळ ओव्हरहेड पॉवर केबलमध्ये बिघाड, पश्चिम मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प

ओव्हरहेड पॉवर केबलमध्ये बिघाड झाल्याने रविवारी दुपारी पश्चिम मार्गावरील लोकलसेवा ठप्प झाली. दुपारी 12.40 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रेल्वे सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांनी रेल्वेट्रॅकवरून चालत स्टेशन गाठले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास ओव्हरहेड पॉवर केबलमध्ये बिघाड झाल्याने डहाणू-चर्चगेट लोकल अचानक थांबली. यामुळे भर उन्हात प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून चालत स्टेशन गाठले. घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी आणि टेक्निकल टीमने घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम सुरू केले. व्हिडिओमध्ये प्रवासी रेल्वे ट्रॅकवर चालताना दिसत आहेत. रेल्वे ठप्प झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.