चंद्रपूर पोलीसांची मोठी कारवाई, आरोपीकडुन 528 ग्रॅम एम.डी ड्रग्स जप्त,1 जण अटकेत

चंद्रपूर पोलीसांची एमडी ड्रग्सची सर्वात मोठी कारवाई केली असून आरोपीकडुन 528 ग्रॅम एम.डी जप्त करण्यात आला आहे. एका आरोपी सह 35 लाख 07 हजार 480 रूपयाचे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी चे नाव वसीम इमदाद खान (37) असून तो मुंबईवरून त्याच्या कारने चंद्रपूरात एम.डी ड्रग्ज पावडर विक्री करीता घेवुन येत असताना चंद्रपूर – नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील साखरवाही फाट्याजवळ स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी वसीम खान ला ताब्यात घेतले. आरोपी वसीम इमदाद खान याच्याकडून एका प्लास्टिकच्या प्रेसलॉक पिशवीत एम.डी (MEPHEDRONE) सदृश्य पांढऱ्या रंगाची ड्रग्ज पावडर 528 ग्रॅम, बाजारभावानुसार 26 लाख 40 हजार रूपयाचे ड्रग्स जप्त करण्यात आले. आरोपी वर गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आले आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे करीत आहे.

  • एन.डी.पी.एस अधिनियम अन्वये चंद्रपूर जिल्हयात एकुण 157 गुन्हे नोंद करून 192 आरोपीवर कार्यवाही करण्यात आली आहे. आरोपीकडुन एकुण 80 लाख 59 हजार 774 रूपये चा माल जप्त करण्यात आला आहे.
  • एम.डी (MEPHEDRONE) ड्रग्ज पावडर बाळणाऱ्या आरोपीवर 14 गुन्हे नोंद करण्यात आले असुन 722.614 ग्रॅम एम.डी ड्रग्ज पावडर जप्त करून 31 आरोपीवर कार्यवाही करून 43 लाख 78 हजार 060 चा माल जप्त करण्यात आला आहे.
  • ब्राउन शुगर पावडर बाळणारे आरोपीवर 01 गुन्हा नोंद करण्यात आला असून 298 ग्रॅम ब्राउन शुगर पावडर जप्त करून 02 आरोपीवर कार्यवाही करून 30 लाख 19 हजार 550रू चा माल जप्त करण्यात आला.