
रात्रीच्या वेळेस बार आणि रेस्टॉरण्टमधून मद्यधुंद अवस्थेत बाहेर पडणाऱ्या नागरिकांना लुटमार करणाऱ्या दोघांना दहिसर पोलिसांनी अटक केली. दिनेश ब्रिजराज चतुर्वेदी आणि राकेश तिवारी अशी त्या दोघांची नावे आहेत. ते दोघे मद्यधुंद अवस्थेतील नागरिकांना घरी सोडण्याचा बहाणा करायचे. त्यानंतर निर्जन स्थळी नेऊन त्यांच्यावर हल्ला करून त्याचे साहित्य आणि मोबाईल घेऊन ते पळून जात असायचे.

























































