बालरुग्णांच्या कुटुंबीयांसाठी माहीममध्ये सुविधागृह

रोनाल्ड मॅकडोनाल्ड हाऊसने उपचार घेत असलेल्या मुलांच्या कुटुंबियांसाठी देशातील पहिले अद्ययावत सुविधागृह माहीममध्ये सुरू केले आहे. या केंद्रामध्ये 16 सुसज्ज खोल्या असून याद्वारे वर्षाकाठी पाचशेहून अधिक कुटुंबांना आधार मिळणार आहे. येथे कुटुंबांना राहण्याची मोफत सोय, पोषक आहार, हॉस्पिटलमध्ये जाण्या-येण्याची व्यवस्था, समुपदेशन आणि समर्पित कर्मचारी वर्गाकडून मदत पुरविली जाईल, जेणेकरून या पालकांना मुलांच्या प्रकृतीवर संपूर्ण लक्ष केंद्रित करता येऊ शकेल. या सुविधागृहाचे उद्घाटन माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पालिका आयुक्त भूषण गगराणी, टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे डॉ. कैलाश शर्मा आणि रोनाल्ड मॅकडोनाल्ड हाऊस इंडियाच्या अध्यक्षा स्मिता जातिया उपस्थित होते.