
राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदारयादी तयार करण्याचा कार्यक्रम 23 सप्टेंबर रोजी प्राप्त झाला आहे. त्यानुसार 1 जुलै 2025 रोजी अस्तित्वात असलेली विधानसभा मतदारयादी संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक विभाग (गट) आणि गणांच्या अंतिम प्रभागरचनेनुसार विभाजित करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर निवडणूक विभाग व गणनिहाय तयार करण्यात आलेली प्रारूप मतदारयादी उद्या (8 रोजी) संबंधित तहसील आणि पंचायत समिती कार्यालय येथे नागरिक व मतदारांना पाहण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरही उपलब्ध करण्यात आली आहे.
या प्रारूप मतदारयादीवर नागरिक आणि मतदारांनी आवश्यक हरकती वा सूचना 14 ऑक्टोबर 2025पर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) सादर कराव्यात, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) संपत खिलारी यांनी केले आहे.