
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन झाले. पण एकीकडे मराठवाड्यात पूराने शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांबद्दल अवाक्षरी काढले नाही. या वेळी पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांबद्दल आपली संवेदनाही व्यक्त केली नाही.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी त्यांनी स्वदेशी वस्तू विकत घ्या म्हणत स्वदेशीचा नारा दिला. पण मराठवाड्यात पूर आला आहे त्याचा साधा उल्लेखही पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात केला नाही. मराठवाड्यात आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यात राज्य सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केल्याची टीका विरोधकांनी केली आहे. अशा वेळी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात पूरग्रस्त शेतकऱ्यांचा साधा उल्लेखही केला नाही. त्यामुळे यावेळचे पंतप्रधान मोदींचे भाषण कोरडे झाले अशी चर्चा होती.