मुंबई काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर, सचिन सावंत मुख्य प्रवक्ते

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसच्या जम्बो कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये सचिन सावंत यांची मुख्य प्रवत्तेपदी वरिष्ठ उपाध्यक्षपदी आमदार अमीन पटेल, अशोक जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी नगरसेवक शीतल म्हात्रे, आनंद शुक्ला, शकील चौधरी, सुरेशचंद्र राजहंस आणि सय्यद हुसैन यांची प्रवत्तेपदी नियुक्ती झाली आहे.

आमदार ज्योती गायकवाड, खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री अस्लम शेख, आमदार अमीन पटेल, आमदार भाई जगताप, चरणसिंह सप्रा, ज्येष्ठ नेते नसीम खान, पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश शेट्टी या नेत्यांचा कार्यकारिणीत समावेश आहे. याशिवाय उपाध्यक्षपदी एकूण 34 जणांना संधी देण्यात आली असून ज्योती गायकवाड, भूषण पाटील, कालू बुधेलिया, मोहसीन हैदर यासारख्या पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

nकाँग्रेसने मंगळवारी उशिरा जाहीर केलेल्या या यादीत सहा जिल्हाध्यक्षांचीही घोषणा केली आहे. यामध्ये दक्षिण मुंबईची जबाबदारी रवी बावकर, दक्षिण-मध्य मुंबईची जबाबदारी कचरू यादव, उत्तर- मध्यची जबाबदारी अर्शद आझमी, उत्तर मुंबईची जबाबदारी राजपात यादव, उत्तर-पूर्वसाठी केतन शाह, उत्तर-पश्चिमसाठी भावना जैन यांच्यावर सोपविण्यात आली आहे.