
एचडीएफसी बँकेने दिवाळीआधीच ग्राहकांना मोठे गिफ्ट दिले आहे. बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स-बेस्ड लेंडिंग रेट (एमसीएलआर) मध्ये 15 बेसिस पॉइंटपर्यंत कपात करण्याची घोषणा केली आहे. यामुळे होम लोन, पर्सनल लोन किंवा बिझनेस लोन घेणाऱ्या कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन दर लागू झाल्यानंतर कर्जदारांचा ईएमआय कमी होईल. कपातीनंतर बँकेची नवीन एमसीएलआर दर पुढीलप्रमाणे राहील. ओव्हरनाइट लोन 8.45 टक्के, एका महिन्याचा कालावधी 8.40 टक्के, तीन महिन्याचा कालावधी 8.45 टक्के, सहा महिन्याचा कालावधी 8.55 टक्के, तीन वर्षाचा कालावधी 8.65 टक्के राहणार आहे.