चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी… हे करून पहा

चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू नयेत, असे बऱ्याच जणांना वाटते. त्यासाठी अनेक जण प्रयत्नही करत असतात. जर तुम्हाला चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या घालवायच्या असतील तर काही घरगुती उपाय आहेत. बोटांनी चेहऱ्याला गोलाकार आणि वरच्या दिशेने मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते, ताण कमी होतो आणि त्वचेची लवचिकता वाढते..

उन्हात बाहेर पडताना सनस्क्रीन लावा आणि टोपीचा वापर करा, कारण सूर्याच्या किरणांमुळे त्वचेवर सुरकुत्या पडतात. नारळ तेल, ऑलिव्ह तेल किंवा एवोकॅडो तेलाने त्वचेला ओलावा मिळतो, ज्यामुळे सुरकुत्या कमी होतात. त्वचेला ओलावा देणे, तिची आर्द्रता टिकवणे आणि त्वचेतील कोलेजन सुधारणे हे सुरकुत्या कमी करण्यासाठी महत्त्वाचे आहे. त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. चेहऱ्याला दररोज स्वच्छ पाण्याने धुवा.