
दिवाळीचा सण अवघ्या चार ते पाच दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठा उजळल्या आहेत. पुणेकरांनी दिवाळीच्या खरेदीसाठी ‘वीकेण्ड’चा मुहुर्त साधल्याने लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, कुमठेकर रोड, रविवार पेठे गर्दीने फुलून गेला. कपडे, दागिने, गृहसजावटीच्या वस्तू, विद्युतमाळा, आकाशकंदील खरेदी करण्यात नागरिक व्यस्त होते.
सर्व फोटो – चंद्रकांत पालकर