
मध्य प्रदेशच्या जमोह येथे संतापजनक घटना घडली आहे. सोशल मीडियावर एक मिम शेअर करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. गावच्या पंचायतने त्या तरुणाला दुसऱ्या तरुणाचे पाय धुऊन तेच पाणी प्यायला भाग पाडले आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तर काँग्रेसने ही घटना संविधान विरोधी असून सरकारव प्रश्न उपस्थित केले आहेक. ही घटना जनपद पंचायत पटेरा येथील सातरिया गावातील आहे.
तरुणाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. मात्र तणाव वाढल्यानंतर त्याने पंधरा मिनीटात पोस्ट डिलीट केली आणि सार्वजनिकरित्या माफिही मागितली. मात्र पंचायतने हे प्रकरण संपविले नाही. गावकऱ्यांनी पंचायत बोलावून मिम शेअर करणाऱ्या तरुणाला दुसऱ्या तरुणाचे पाय धुवून ते घाणेरडे पाणी प्यायला भाग पाडले. त्याचबरोबर सर्व समजाची माफी मागायला सांगितली. मात्र आता या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेसने सोशल मीडियावर या प्रकरणावर टीका केली आहे.
पीडित कुटुंबाने या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. जिल्हा प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. पोलिस अधीक्षकांनी पाटेरा पोलिस ठाण्याच्या प्रभारींना तपास अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे आणि अहवाल मागवला आहे.