‘मना’चे श्लोक नवीन नावासह 16 ऑक्टोबरला पुनर्प्रदर्शित

वादात सापडलेला ‘मना’चे श्लोक हा चित्रपट आता नवीन नावासह 16 ऑक्टोबरपासून पुन्हा प्रदर्शित होणार आहे.

मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मना’चे श्लोक हा  मराठी चित्रपट 10 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. मात्र चित्रपटाच्या शीर्षकाचे समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाच्या श्लोकाशी साधर्म्य असल्याने काही हिंदुत्ववादी संघटनांनी चित्रपटाला तीव्र विरोध केला आणि पुण्यासह विविध ठिकाणी गोंधळ घालून खेळ बंद पाडण्यात आले. या पार्श्वभूमीवर मृण्मयी देशपांडे हिने चित्रपटाचे प्रदर्शन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून गुरुवार, 16 ऑक्टोबरपासून नवीन नावासह पुन्हा प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे.

  चित्रपटाच्या प्रमाणपत्राला आणि प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी सज्जनगड येथील समर्थ सेवा मंडळाच्यावतीने उच्च न्यायालयात करण्यात आली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने गुरूवार, 9 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत ‘मना’चे श्लोक सिनेमा प्रदर्शित करण्यास हिरवा पंदील दाखवला होता.