
देशात सर्वाधिक दैनंदिन वेतन दिल्ली राज्यात आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशाचे सरासरी वेतन 1077 रुपये आहे, पण औद्योगिकीकरण व शहरीकरण झालेली राज्ये यापेक्षा पुढे आहेत. दिल्लीचे सरासरी दैनंदिन वेतन हे 1346 रुपये इतके आहे. याच्या खालोखाल कर्नाटक (1296 रुपये) आणि महाराष्ट्र (1231 रुपये) असे दैनंदिनी वेतन आहे. दिल्ली ही गुरुग्राम आणि नोएडाच्या जवळ आहे, याचा जास्त वेतन मिळण्यासाठी फायदा होतो. तर कर्नाटकचा तंत्रज्ञान क्षेत्राचे नेतृत्व बंगळुरू करते, येथे कुशल कामगारांना प्रीमियम वेतन मिळते. महाराष्ट्राला मुंबई आणि पुणे या शहरांकडून उत्पादन, फायनान्स आणि मनोरंजन या क्षेत्रांचा आधार मिळतो. यामधून तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रात बंगळुरू आणि मुंबईचे वाढते महत्त्व लक्षात येते.