आता यूपीआयने एका क्लिकवर शाळेची फी भरता येणार

शाळांमध्ये डिजिटल पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील शाळांना एक पत्र जारी केले आहे. या पत्रात शिक्षण मंत्रालयाने एनसीईआरटी, सीबीएसई, केंद्रीय विद्यालय स्कूल, आणि एनव्हीएससारख्या शैक्षणिक संस्थांना फी भरण्यासाठी यूपीआयसारख्या डिजिटल पेमेंट पद्धती स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.

फी भरण्यासाठी शाळांमध्ये रांगा लागणार नाही. तसेच शाळा प्रशासन तंत्रज्ञानाबाबत अद्ययावत राहील. बहुतांशी पालक शाळेचे शुल्क रोखीने भरतात. त्यामुळे फी भरण्यासाठी पालकांनी एखादा विशिष्ट दिवस राखून ठेवावा लागतो. डिजिटल पेमेंट पद्धतीमुळे या सर्वांतून पालकांची सुटका  होईल.  

डिजिटल साक्षरता

ही प्रणाली डिजिटल इंडियाच्या कल्पनेला देखील प्रोत्साहन देते.  यामुळे केवळ शाळेचे प्रशासन सुधारणार नाही, तर पालकांना अधिक डिजिटल साक्षरता मिळेल. डिजिटल पेमेंट पद्धती शाळा प्रशासन आणि पालकांच्यादृष्टीने लाभदायकच ठरेल.