
ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा चॅप्टर 1’ प्रेक्षकांना भावत आहे. 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित ‘कांतारा चॅप्टर 1’ ने अनेक मोठय़ा चित्रपटांना मागे टाकले आहे. ‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार, 10 व्या दिवशी या चित्रपटाने 37 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. 10 व्या दिवसाच्या कलेक्शनसह ‘कांतारा चॅप्टर 1’ ने या वर्षीच्या ‘सैयारा’च्या देशातील नेट कलेक्शनला मागे टाकत 329.2 कोटी कमावले.
ऋषभ शेट्टीने ‘कांतारा’मध्ये लेखन, दिग्दर्शन या जबाबदाऱ्या सांभाळतानाच मुख्य भूमिकाही साकारली आहे. वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांचा रोमँटिक कॉमेडी ड्रामा ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ त्याच दिवशी प्रदर्शित झाला, पण त्याचा ‘कांतारा चॅप्टर 1’ वर अजिबात परिणाम झाला नाही. त्यासह ‘कांतारा चॅप्टर 1’ आता वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. ‘कांतारा चॅप्टर 1’ जगभरात कन्नड, हिंदी, तेलुगू, तमीळ व मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.