
सलामीवीर प्रणय कपाडियाच्या नाबाद 157 धावांच्या फटकेबाज खेळीच्या जोरावर इस्लाम जिमखान्याने शिवाजी पार्क जिमखान्याचा 196 धावांनी दणदणीत पराभव करत 78 व्या पोलीस ढाल क्रिकेट स्पर्धेच्या ‘ब’ गट साखळी सामन्यात शानदार विजय मिळवला. इस्लाम जिमखान्याने प्रथम फलंदाजी करत 70 षटकांत 9 बाद 293 धावा उभारल्या. कपाडियाने 199 चेंडूंत 15 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 157 धावा ठोकल्या, तर गंधार भाटवडेकरने 70 धावांची साथ दिली. सत्यम चौधरीने 5 विकेट घेतल्या. प्रत्त्युतरादाखल शिवाजी पार्क जिमखान्याचा डाव फक्त 31.3 षटकांत 97 धावांवर गडगडला.