
महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित मलबेरी कॉटेज, महाबळेश्वर येथे सुरू असलेल्या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत जळगावच्या संदीप दिवेने पुण्याच्या रहीम खानचा 19-16, 25-8 असा सहज फडशा पाडून पाचव्या फेरीत प्रवेश केला, तर रत्नागिरीच्या अभिषेक चव्हाणने मुंबई उपनगरच्या जितेश कदमला 25-1, 25-7 असे पराभूत केले.
पुरुष एकेरी चौथ्या फेरीचे इतर निकाल
गिरीश तांबे (मुंबई) वि. वि. गणेश तावरे (पुणे) 17-16, 25-2. महम्मद घुफ्रान (मुंबई) वि. वि. सागर भोसले (पुणे) 25-8, 19-22, 25-3. सिद्धांत वडवलकर (मुंबई) वि. वि. निलांश चिपळूणकर (मुंबई) 25-10, 25-19. अभिषेक चव्हाण (रत्नगिरी) वि. वि. जितेश कदम (मुंबई उपनगर) 25-1, 25-7.