दिवाळीचा फराळ अधिक दिवस टिकण्यासाठी या गोष्टी फाॅलो करा, वाचा

दिवाळी म्हटल्यावर घरी गोडा धोडाचे नानाविध पदार्थ तयार होतात. परंतु हे पदार्थ आपण नीट न साठवल्यामुळे, पदार्थ लवकर खराब होण्याची भीती असते. गोड पदार्थ पाणी लागल्यामुळे अनेकदा पटकन खराब होतात. म्हणूनच गोड पदार्थ साठवणे ही सुद्धा एक कला आहे. गोड पदार्थ साठवताना काही सोप्या टिप्स लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

दिवाळी फराळ- तुमच्याही करंज्या फसताहेत का, मग या टिप्स वापरून बघा, करंजी होईल खुसखुशीत

सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात मिठाई आणली तर त्या खराब होण्याची चिंता वाढते. किंवा घरी केलेले गोडा धोडाचे पदार्थही खराब होऊ नयेत म्हणून या टिप्सचा अवलंब करावा. या टिप्स फॉलो केल्यास, मिठाई खराब होण्यापासून वाचेल.

मावा मिठाई ही खरंतर ठराविक दिवसांमध्ये खाऊन संपवायची असते. मावा मिठाईला पाणी लागू नये याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. मावा मिठाईला पाणी लागल्यास त्याला पटकन बुरशी येते. त्यामुळे मावा मिठाईला कोरड्या हातानेच साठवून ठेवावे.

दिवाळीत भेसळयुक्त मिठाई ओळखण्यासाठी या टिप्सचा वापर करा, वाचा

शंकरपाळी, बालुशाही, मोहनथाळ यासारखी मिठाई ही हवाबंद डब्यामध्ये ठेवावी. म्हणजे अधिक प्रमाणात टिकते.

अनेकदा काही डब्यांमध्ये मिठाईला पाणी सुटते. मिठाईला पाणी सुटू नये म्हणून, मिठाई ही काचेच्या बरणीमध्ये ठेवणे हे सर्वात उत्तम. मोठे काचेचे भांडे असेल, तर तुम्ही त्यात मिठाई साठवू शकता.

मिठाई हवाबंद डब्यात ठेवल्याने खराब होत नाही. गोड पदार्थ खराब होण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांना उष्णता सहन होत नाही. म्हणूनच मिठाई ही हवाबंद डब्यात ठेवणे केव्हाही उत्तम.