
चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे फार मोठे नुकसान झाले. वरोरा तालुक्यातील लोधीखेडा गावातील शेतकरी प्रमोद मुंजारे यांनी काढणीस आलेले अडीच एकर मधील सोयाबीन पीक शेतात पेटवून दिल्याची दुर्दैवी घटना घडली.
सततच्या पावसाने सोयाबीनच्या शेंगा गळून पडल्या शिवाय येलो मोजॅक, मूळ कूज सारख्या रोगाच्या सोयाबीन पिकावर प्रादुर्भाव होऊन पीक पूर्णपणे करपले. सोयाबीन सोंगल्याचा खर्च केल्यानंतर पिकात शेंगाच नसल्याने काढणीचा खर्च परवडणार नाही. त्यामुळे शेतकरी सोयाबीन पिकाला आग लावून जाळून टाकत आहे. दोन दिवसापूर्वी एका शेतकऱ्याने वरोरा तालुक्यात नापिकेने आत्महत्या सुद्धा केल्याची घटना घडली आहे.




























































