
सोशल मीडियावर सध्या मार्केटिंग करणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्यक्ती स्वतःचे नाव रवी शर्मा असे सांगतो. मार्केटिंगच्या सेशनला उपस्थित असलेल्या व्यक्तींना तो आपला प्रवास सांगतो. मार्केटिंगमधून माझे महिन्याचे टर्नओव्हर 100 कोटी रुपये आहे, अशा बाता मारतो. इतकंच काय तर तो सहा लाख रुपये जीएसटी भरत असल्याचेही सांगतो.
माझ्याकडे एकापेक्षा एक कार आहेत. मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, स्कोडा, स्कॉर्पिओ आहे. आता मी रॉल्स रॉयस कार खरेदी करणार आहे. त्या कारची किंमत 8 कोटी रुपये आहे. हे सर्व आरसीएम कंपनीच्या मार्केटिंगमधून शक्य झाले आहे. हिंदुस्थानच्या मोठमोठ्या शहरात माझी प्रॉपर्टी आहे. जयपूरमध्ये 15 कोटी रुपये खर्च करून मी मॉल खरेदी करत आहे. रवी शर्मा फेकाफेकी करत असल्याचे नेटिजन्सने म्हटले आहे.