हमासच्या तळावर इस्रायलचा हल्ला, गाझा शांतता कराराचे काय होणार?

इस्रायल आणि हमासमध्ये झालेल्या गाझा शांतता कराराचे भवितव्य पुन्हा एकदा अंधारात गेले आहे. इस्रायलने दक्षिण गाझातील हमासच्या कॅम्पवर हल्ले केले आहेत. त्यात 11 लोक मारले गेल्याचे वृत्त आहे.

हमासने राफाह येथील इस्रायली सैन्याच्या वाहनांवर रणगाडाभेदी क्षेपणास्त्रs डागली. त्याचबरोबर गोळीबारही करण्यात आला. करारात ठरल्यानुसार राफाह येथील हमासचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी सैन्य गेले असताना हा हल्ला झाला. त्यास प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने हमासच्या तळावर हवाई हल्ले केल्याचे इस्रायली सैन्याने स्पष्ट केले.