
मुंबईच्या मदनपूरा परिसरात मोठा अपघात घडला आहे. येथे फानूसवाला इमारतीचा एक भाग कोसळल्याने अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी व्ही.एन. सांगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी 1 वाजता कंट्रोल रूमला इमारत कोसळल्याची माहिती मिळाली. आमची टीम तत्काळ घटनास्थळी पोहोचली. वरच्या मजल्यावरील दोन खोल्या रिकाम्या होत्या. खाली काम करणाऱ्या दोन मजुरांना दुखापत झाली आहे. एका महिलेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिला देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या शोध मोहीम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
#WATCH मुंबई: मदनपुरा इलाके में स्थित फानूसवाला बिल्डिंग का एक हिस्सा ढह जाने की घटना सामने आई है। सर्च ऑपरेशन जारी है। pic.twitter.com/HtunJwOq2k
— ANI_HindiNews (@AHindinews) October 22, 2025