निवडणुकीत मतांची खरेदी करण्यासाठी केलेला राजकीय जुगाड, रोहित पवारांनी सरकारला सुनावलं

मध्यमवर्गीय मराठी कंत्राटदारांचे थकित 80 हजार कोटी रुपये देण्यासाठी सरकारकडं पैसे नाहीत पण केवळ सत्ताधारी पक्षाच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटी रुपये द्यायला मात्र पैसे आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकराला सुनावलं. तसेच . विकासनिधीच्या नावाखाली सरकारी तिजोरीतील पैशातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतांची खरेदी करण्यासाठी केलेला हा राजकीय जुगाड आहे अशी टीकाही रोहित पवार यांनी केली.

एक्सवर पोस्ट करून रोहित पवार म्हणाले की, मध्यमवर्गीय मराठी कंत्राटदारांचे थकित 80 हजार कोटी रुपये देण्यासाठी सरकारकडं पैसे नाहीत पण केवळ सत्ताधारी पक्षाच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटी रुपये द्यायला मात्र पैसे आहेत. विकासनिधीच्या नावाखाली सरकारी तिजोरीतील पैशातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतांची खरेदी करण्यासाठी केलेला हा राजकीय जुगाड तर आहेच पण लोकशाहीची थट्टाही आहे. शेवटी जात, धर्म असा भेदभाव करून आणि खोक्यातून जन्म घेतलेल्यांकडून समान न्यायाची आणि लोकशाहीचा सन्मान करण्याची अपेक्षा करणं म्हणजे गुंडाकडून सद्वर्तनाचं प्रवचन ऐकण्यासारखं आहे असा टोलाही त्यांनी लगावला.