‘अजित’ आणि ‘अपराजित’चे जलावतरण

भारतीय तटरक्षक दलाने गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे ‘अजित’ आणि ‘अपराजित’ या दोन प्रगत वेगवान गस्ती नौकांचे जलावतरण केले. भारतीय तटरक्षक दलासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेडद्वारे बांधल्या जात असलेल्या स्वदेशी बनावटीच्या आठ एफपीव्ही मालिकेतील हे सातवे आणि आठवे जहाज आहे. जीएसएलने पूर्णपणे डिझाइन केलेली आणि बांधलेली एफपीव्ही देशाच्या स्वदेशी जहाजबांधणी क्षमतेचे वाढते सामर्थ्य प्रतिबिंबित करतात. 52 मीटर लांबीची आणि 320 टन वजन वाहून नेणारी ही जहाजे पंट्रोलेबल पिच प्रोपेलर्सने सुसज्ज आहेत.

या गस्ती नौका मत्स्य व्यवसाय संरक्षण, किनारी गस्त, तस्करी विरोधी, चाचेगिरी विरोधी आणि विशेषतः देशातील बेट प्रदेश आणि विशेष आर्थिक क्षेत्रात (ईईझेड) शोध आणि बचाव मोहिमा, यासारख्या बहु-कार्यात्मक भूमिका बजावण्यासाठी सक्षम आहेत.