हिंदुस्थानच्या ‘त्रिशूल’सरावाने पाकिस्तानला धडकी; दोन दिवस आधीच हवाई क्षेत्र बंद, उड्डाणांवर घातली बंदी

हिंदुस्थानी सैन्य 30 ऑक्टोबरपासून राजस्थानमधील पाकिस्तान सीमेजवळ ’त्रिशूल’ हा लष्करी सराव सुरू करणार आहे. हिंदुस्थानच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला धडकी भरली आहे. पाकिस्तानने त्यांच्या मध्य आणि दक्षिण हवाई क्षेत्रात अनेक हवाई वाहतूक मार्ग बंद करण्याची घोषणा केली आहे. ही बंदी 28 आणि 29 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. जारी केलेल्या नोटमनुसार, या दोन दिवसांत अनेक हवाई मार्ग उपलब्ध राहणार नाहीत आणि उड्डाणे स्थगित करण्यात आली आहेत. हिंदुस्थान 30 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत त्रिशूल नावाच्या त्रिसेवेच्या संयुक्त लष्करी सरावाची घोषणा केली असून हा सराव पाकिस्तानच्या सीमेजवळील सर क्रीक जवळ होईल. हा सराव 28,000 फूट उंचीपर्यंत चालेल़

तिन्ही सैन्यांची पॉवर दिसणार

या सरावात तिन्ही सैन्य एकत्रित ऑपरेशन्स, खोल हल्ले आणि बहु-डोमेन युद्धाचे समन्वय आणि सराव करतील. सैन्य अनेक नवीन स्वदेशी शस्त्रs आणि उच्च-तंत्रज्ञान प्रणालींची चाचणी देखील घेईल. यामध्ये टी-90एस आणि अर्जुन टँक, हॉवित्झर, अपाचे हल्ला हेलिकॉप्टर आणि हेवी-लिफ्ट हेलिकॉप्टरचा समावेश असेल. हा सराव जैसलमेरपासून सुरू होईल आणि कच्छपर्यंत विस्तारेल. कच्छ समुद्राजवळ आहे, त्यामुळे हवाई दल आणि नौदलाची विशेष विमाने या भागात काम करतील.

 30 हजार जवान तैनात करणार

सीमेवर 12 दिवस चालणारा आतापर्यंतचा सर्वात मोठा लष्करी सराव आहे. थारच्या वाळवंटात लष्कर, हवाई दल आणि नौदलाचे 30,000 सैनिक संयुक्त सराव करतील. हा सराव 30 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि 10 नोव्हेंबरपर्यंत चालेल. या सरावादरम्यान, सीमेवरील
काही भागात व्यावसायिक उड्डाणांचे मार्ग देखील बदलले जाऊ शकतात.