मस्कचे एका झटक्यात बुडाले 11 अब्ज डॉलर

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले इलॉन मस्क यांना जोरदार झटका बसला आहे. मस्क यांची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे शेअर 3.4 टक्के घसरल्याने त्यांच्या संपत्तीत तब्बल 11 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 96,606 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ब्लूमबर्ग बिलियनेयर इंडेक्सच्या माहितीनुसार, मस्क यांची एकूण संपत्ती आता 451 अब्ज डॉलर राहिली आहे. 2025 मध्ये आतापर्यंत त्यांच्या नेटवर्थमध्ये 18 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. एकीकडे मस्क यांना झटका बसला आहे. तर दुसरीकडे जगातील टॉप 10 अब्जाधीशांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. ओरेकलचे संस्थापक लॅरी एलिसन हे या वर्षी आतापर्यंत 151 अब्ज डॉलरची कमाई करणारे अब्जाधीश बनले आहे. त्यांची नेटवर्थ 1.82 अब्ज डॉलरने वाढून आता 343 अब्ज डॉलर झाली आहे. हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी 103 अब्ज डॉलरच्या नेटवर्थसोबत 18 व्या नंबरवर आहेत. त्यांच्या संपत्तीत यावर्षी 12.2 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. तर गौतम अदानी 92.3 अब्ज डॉलरच्या नेटवर्थसोबत ते 20 व्या स्थानावर आहेत.

जागतिक टॉप 10 अब्जाधीश

एलन मस्क     451 बिलियन डॉलर्स

लॅरि एलिसन 343 बिलियन डॉलर्स

मार्क झुकरबर्ग 260 बिलियन डॉलर्स

जेफ बेजोस     247 बिलियन डॉलर्स

लॅरी पेज        227 बिलियन डॉलर्स

सर्गेई ब्रिन      212 बिलियन डॉलर्स

बर्नार्ड अरनॉल्ट    195 बिलियन डॉलर्स

स्टीव्ह वॉल्म  180 बिलियन डॉलर्स

जेंसन हुआंग   162 बिलियन डॉलर्स

मायकले डेल       159 बिलियन डॉलर्स