देश  विदेश – सिंगापूरमध्ये हिंदुस्थानी नर्सला तुरुंगवासाची शिक्षा

सिंगापूरमध्ये हिंदुस्थानी नर्सला तुरुंगवासाची शिक्षा

सिंगापूरच्या रेफल्स हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या हिंदुस्थानी नर्सला 14 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा कोर्टाने ठोठावली. या महिलेवर तरुणासोबत छेड केल्याचा आरोप आहे.
14 महिन्याच्या तुरुंगवासाच्या शिक्षेसोबत दोन कोडे मारण्याची शिक्षाही कोर्टाने सुनावली. एलीप शिवा नागू असे या नर्सचे नाव आहे. महिला नर्सने कोर्टात आपल्या गुह्याची कबुली दिली आहे. यानंतर कोर्टाने ही शिक्षा ठोठावली. 18 जून रोजी या नर्सने तरुण मुलासोबत छेडछाड केली होती. या घटनेनंतर हॉस्पिटलने नर्सला कामावरून काढून टाकले होते.

न्यूयॉर्क महापौरपदासाठी मतदानाला सुरुवात

न्यूयॉर्कमध्ये महापौर निवडणुकीसाठी मतदानाला आजपासून सुरुवात झाली आहे. हे मतदान 2 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. मुख्य मतदान 4 नोव्हेंबरला होणार आहे. तर नव्या वर्षात नवा महापौर न्यूयॉर्कला मिळणार आहे. या निवडणुकीवर संपूर्ण अमेरिकेची नजर आहे. या निवडणुकीत हिंदुस्थानी वंशाचे जोहरान ममदानी हे डेमोव्रेटिक पार्टीचे उमेदवार आहेत. विविध पोल्समध्ये जोहरान ममदानी यांना 47 टक्के लोकांचा पाठिंबा मिळा आहे. तर अँड्र्यू कुओमो आणि रिपब्लिकन उमेदवार कर्टिस सिल्वा यांच्या तुलनेत ममदानी खूपच पुढे आहेत.

उत्तर कोरिया, इराण आणि म्यानमार काळ्या यादीत

जगभरात दहशतवाद आणि मनी लॉण्ड्रिंग वर देखरेख करणारी जागतिक संस्था फायनान्शियल अॅक्स टास्क पर्ह्स (एफएटीएफ) ने उत्तर कोरिया, इराण आणि म्यानमार यांना पुन्हा एकदा काळ्या यादीत ठेवले आहे. तर नेपाळ, सीरिया, केनिया, अल्जीरिया, बुल्गारिया, व्हिएतनाम, नामिबिया, दक्षिण सुडान, मोनाको, लाओससह 18 देशांना ग्रेलिस्टमध्ये ठेवण्यात आले आहे. काळ्या यादीत ठेवण्यात आलेल्या या तिन्ही देशांत अँटी-मनी लॉण्ड्रिंग आणि काउंटर टेररिस्ट फायनान्सिंग व्यवस्थेत खूप त्रूटी आहेत.

हेलिकॉप्टरने 82 हजार भाविक केदारनाथला पोहोचले

उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथील केदारनाथ मंदिराला भेट देण्यासाठी 14 लाख भाविकांनी 21 किमी पायी चालले, तर 82 हजार भाविकांनी हेलिकॉप्टरने केदारनाथला पोहोचले. केदारनाथ मंदिरात 17.68 दशलक्ष यात्रेकरूंनी बाबा केदार यांचे दर्शन घेतले. केदारनाथ यात्रा 2 मे ते 23 ऑक्टोबर पर्यंत एकूण 175 दिवस चालली. यात्रेच्या सुरुवातीच्या महिन्यांत, मे आणि जूनमध्ये, 1.3 दशलक्षाहून अधिक यात्रेकरू मंदिरात पोहोचले. या वर्षी केदारनाथ यात्रेदरम्यान घोडे आणि खेचरांच्या वाहतुकीतून 91.36 कोटींपेक्षा जास्त महसूल मिळाला आहे. रुद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाला 47.1 दशलक्ष पेक्षा जास्त महसूल मिळाला आहे.

आयआरसीटीसीची वेबसाईट पुन्हा एकदा डाऊन

इंडियन रेल्वे पॅटरिंग अँड टूरिज्म कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)ची वेबसाईट शनिवारी सकाळी काही तासांसाठी ठप्प पडली. वेबसाईट डाऊन झाल्यामुळे हजारो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. दिवाळी आणि छट पूजानिमित्त तिकीट काढणाऱया प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. परंतु शनिवारी सकाळी वेबसाइट बंद पडली. तिकीट काढणाऱया शेकडो जणांना ‘धीस साइट इज करंटली अनरिचेबल, प्लीज ट्राय अफ्टर सम टाईम’ असे मेसेज येत होते. सध्या सणांची धामधूम असल्याने तत्काळ तिकिटाला मोठी मागणी आहे. मागील आठवडय़ातही आयआरसीटीसीची वेबसाईट बंद पडली होती.