
हिंदुस्थानचा विश्वविजेता डी. गुकेश 4,12,000 डॉलर्स बक्षीस रकमेच्या ‘क्लच शतरंज चॅम्पियन्स’ स्पर्धेत उतरला असून त्याला करिअरमधील सर्वात मोठया आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. युरोपियन क्लब कपमध्ये आपल्या ‘सुपर चेस’ संघाला विजेतेपद मिळवून दिल्यानंतर तो थेट अमेरिकेत दाखल झाला आहे. या स्पर्धेत मॅग्नस कार्लसन, हिकारू नाकामुरा आणि फॅबियानो कारुआना यांच्यासारखे अव्वल खेळाडूही सहभागी आहेत. 18 सामन्यांच्या या पंधरवडाभर चालणाऱया स्पर्धेत विजेत्यास 1,20,000, उपविजेत्यास 90,000, तर तिसऱया व चौथ्या क्रमांकासाठी अनुक्रमे 70,000 आणि 60,000 डॉलर्सची बक्षीस रक्कम मिळेल. प्रत्येक फेरीतील विजयासाठी 72,000 डॉलर्सचे बोनस बक्षीसही दिले जाईल.
























































