पुऱ्या तेलकट होत असतील… हे करून पहा

पुऱ्या कमी तेलकट होण्यासाठी कणकेत दोन कप गव्हाच्या पिठात अर्धा कप तांदळाचे पीठ किंवा रवा मिसळल्यास पुऱ्या पुरपुरीत होतात आणि कमी तेल शोषतात. तेल खूप जास्त गरम असल्यास पुऱ्या जास्त तेल शोषून घेतात. म्हणून तेल नेहमी मध्यम आचेवर ठेवा. पुऱ्या लाटताना कोरड्या पिठाऐवजी थोडे तेल वापरल्यास त्या मऊ राहतात आणि फाटत नाहीत.

तेलात पिठाचा एक छोटा तुकडा टाकून पहा. जर तो लगेच वर येऊन फुगला, तर तेल तळण्यासाठी योग्य तापलेले आहे. पुरी तळताना तिला झाऱ्याने हलके दाबून फुगवा आणि नंतर पलटा. यामुळे पुऱ्या टम्म फुगतात आणि जास्त तेलकट होत नाहीत