
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसीम मुनीर यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. हे दोघेही महान आहेत, असे ट्रम्प म्हणाले. आसियान शिखर परिषदेला संबोधित करताना त्यांनी पाकिस्तान व अफगाणिस्तानमधील तणावाच्या परिस्थितीवर भाष्य केले. या दोन्ही देशांतील संघर्ष मी चुटकीसरशी सोडवू शकतो, असे ते म्हणाले.
























































