
उत्तरप्रदेशातील हाथरस जिल्ह्यात अंधश्रद्धेचे एक प्रकरण समोर आले आहे. सापाच्या दंशाने मृत्यू झालेल्या 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर अघोरी प्रकार करुन जीवंत करण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना हसायन क्षेत्रच्या इटरनी गावचे आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 20 ऑक्टोबर रोजी रात्री नरेंद्र कुमार यांचा 12 वर्षीय मुलगा कपिल झोपला असताना त्याला विषारी सापाने दंश केला.घरच्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ त्याला रुग्णालयात घेऊन धावले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता डॉक्टरांनी कपिलला मृत घोषित केले. आपला मुलगा मृत झालाय यावर त्यांचा विश्वासच बसेना अशावेळी त्याच्या नातेवाईकांनी एक मांत्रिक त्याचे विष काढू शकतो असा सल्ला दिला, कदाचित त्याने कपिल जीवंत होऊ शकतो. कपिलचा मृतदेह घरी आणल्यानंतर, कुटुंबाने स्थानिक मांत्रिकाला बोलावले. अघोरी प्रकार करणारा मांत्रिक गावात आला आणि तंत्रमंत्राचा वापर करुन विधी करू लागला, मात्र तो यशस्वी न झाल्याने मृतदेह पुरण्यात आला. तथापि, दुसऱ्या दिवशी कुटुंबाने आणखी एक मांत्रिक आणला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा मृतदेह बाहेर काढून त्याच्यावर अघोरी प्रकार केला.
असे चार दिवस चालले. त्यानंतर कुटुंबाने अन्य भागातील इतर मांत्रिकांनाही बोलावले, ज्यांनी मृताला जिवंत करण्यास सक्षम असल्याचा दावा केला. जेव्हा त्यांच्या कोणत्याही प्रयत्नांना यश आले नाही, तेव्हा कुटुंबाने 24 ऑक्टोबर रोजी पोलिसांना कळवले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला, तो शवविच्छेदनासाठी पाठवला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. सध्या, ही घटना परिसरात चर्चेचा विषय आहे.
























































