
छत्तीसगडच्या बेमेतरा शहरात रविवारी एक भयंकर अपघात घडला. येथे एका डिफेंडर कारने एकामागे एक अशा तब्बल 5 गाड्यांना धडक दिली. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 5 लोक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उ़डली. नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून लोकांनी या कार मालकाच्या घराची तोडफोड केली. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
रविवारी झालेल्या या भीषण अपघातात डिफेंडरने ज्या पाच वाहनांना धडक दिली त्यात एक दुचाकी, एक स्कूटर आणि एक पिकअपचा समावेश होता. पिकअपवर बसलेल्या एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सात जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने यामधील आणखी दोघांनी आपला जीव गमावला.
शहरात एका भरधाव वेगाने येणाऱ्या डिफेंडर कारने एकामगोमाग तब्बल 5 गाड्यांना धडक दिल्यानंतर जनतेत संतापाची लाट उसळली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या शेकडो लोकांनी कार मालकाच्या घराची तोडफोड केली. बंटी मालक सिंह असे त्या डिफेंडर कारच्या मालकाचे नाव असून तो एक कापड व्यापारी आहे. शहरातील वाढता तणाव पाहून बेमेतराचे एसएसपी रामकृष्ण साहू घटनास्थळी पोहोचले आणि त्यांच्या टीमने तेथील परिस्थिती नियंत्रणात आणली.
तसेच त्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. सध्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी केली जात आहे.
























































