
अयोध्येत बांधण्यात आलेल्या भव्य राममंदिरासाठी देश आणि विदेशातील रामभक्तांनी भरभरून दान दिले आहे. अवघ्या वर्षभरात भाविकांनी तब्बल तीन हजार कोटी रुपयांचे दान दिले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. राममंदिराच्या बांधकामासाठी निधी संकलन मोहिमेवेळी हिंदुस्थान आणि विदेशातील लाखो रामभक्तांनी मुक्तहस्ताने योगदान दिले आहे. तीन हजार कोटींहून अधिक रक्कम रामलल्ला चरणी अर्पण केली आहे. इमारत बांधकाम समितीच्या अध्यक्षांच्या माहितीनुसार, आतापर्यंत अंदाजे 1 हजार 500 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. संपुलातील उर्वरित चालू कामासह एपूण खर्च अंदाजे 1 हजार 800 रुपये आहे, असे म्हटले आहे. मुख्य मंदिराच्या जवळपास सहा मंदिरांवर ध्वजदंड आणि कलश स्थापन करण्यात आला आहे. महर्षी वाल्मिकी, वशिष्ठ, विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, निषादराज, शबरी आणि अहिल्या मंदिर सप्त मंडपाचेही काम पूर्ण झाले आहे. राममंदिर निर्माणाव्यतिरिक्त पूजा प्रार्थनेची सोय, फूटपाथ, दर्शनाचा भाग सर्व व्यवस्था करण्यात आली. मुख्य मंदिराच्या जवळपास भगवान शिव, भगवान गणेश, भगवान हनुमान, सूर्यदेव, देवी भगवती, देवी अन्नपूर्णाचे मंदिर पूर्ण झाले आहे.
आतापर्यंत राममंदिरासाठी 1500 कोटी रुपये खर्च झाला आहे. संपूर्ण मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर मुख्य मंदिरावर ध्वजारोहण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 25 नोव्हेंबरला अयोध्येत येणार आहेत.






























































