INDW vs SAW Final – हिंदुस्थान विश्वविजेता! महिला संघाने कोरले विश्वचषकावर नाव

नवी मुंबईत नवा इतिहास रचत हिंदुस्थानच्या महिला संघाने आयसीसी विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केला. अंतिम लढतीत हिंदुस्थानने दक्षिण आफ्रिकेपुढे विजयासाठी 298 धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ 246 धावांमध्ये बाद झाला आणि महिला संघाने 52 धावांनी विजय मिळवत पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याचा कारनामा केला. दीप्ती शर्मा हिने 5 विकेट्स, तर शेफाली वर्मा हिने 2 विकेट्स घेतल्या. शेफाली हिला प्लेअर ऑफ द मॅच आणि दीप्ती हिला प्लेअर ऑफ द सिरीजने गौरविण्यात आले.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने  50 षटकात 7 बाद 298 धावा केल्या होत्या. मानधना आणि शेफाली वर्मा यांनी हिंदुस्थानला शतकीय सलामी दिली. स्मृती 45 धावा काढून बाद झाली. त्यानंतर शेफाली वर्मा (87) आणि दीप्ती शर्माने (58) अर्धशतकीय खेळी करत संघाला 300 धावांच्या जवळ पोहोचवले. रिचा घोष हिने 34 धावांची खेळी केली.

  • 50 षटकानंतर हिंदुस्थानच्या 7 बाद 298 धावा
  • 45 षटकानंतर हिंदुस्थानच्या 5 बाद 262 धावा
  • 40 षटकानंतर हिंदुस्थानच्या 4 बाद 229 धावा
  • 35 षटकानंतर हिंदुस्थानच्या 3 बाद 200 धावा
  • हिंदुस्थानला तिसरा धक्का, शेफाली पाठोपाठ जेमिमा बाद
  • 166 धावांवर बसला दुसरा धक्का, कर्णधार हरमनप्रीत कौर मैदानात
  • हिंदुस्थानला दुसरा धक्का, शेफाली वर्मा 87 धावांवर बाद
  • 25 षटकानंतर हिंदुस्थानच्या 1 बाद 151 धावा
  • 49 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकारांच्या मदतीने गाठला 50 चा आकडा
  • स्मृती बाद झाल्यावर जेमिमा रॉड्रिग्ज मैदानात
  • हिंदुस्थानला पहिला धक्का, स्मृती 45 धावांवर बाद
  • 15 षटकानंतर हिंदुस्थानच्या 100 धावा पूर्ण
  • दहा षटकानंतर हिंदुस्थानच्या बिनबाद 64 धावा
  • 6.3 षटकात हिंदुस्थानचे अर्धशतक पूर्ण
  • स्मृती-शेफालीची फटकेबाजी, हिंदुस्थानचे अर्धशतक फलकावर
  • स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा सलामीला उतरली मैदानात.
  • मैदान खचाखच भरले
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेकीचा कौल जिंकला, हिंदुस्थानची प्रथम फलंदाजी
  • पावसाच्या व्यत्ययानंतर थोड्याचवेळात सुरु होणार सामना
  • 4.30 वाजता नाणेफेक होईल आणि सामना 5 वाजता सुरू होईल
  • कव्हर हटवले, थोड्याच वेळात सामना सुरू होण्याची शक्यता
  • 3 नोव्हेंबर रोजीही पावसाची शक्यता 55 टक्के असून त्या दिवशीही किमान 20-20 षटकांचा खेळ झाला नाही तर हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेला संयुक्त विजेते घोषित केले जाईल.
  • आयसीसीच्या नियमानुसार आज हा सामना किमान 20-20 षटकांचाही खेळ शक्य झाला नाही तर हा सामना सोमवारी 3 नोव्हेंबर या रिझर्व्ह डेच्या दिवशी खेळवला जाईल.
  • चाहत्यांना पावसामुळे सामना सुरु होण्याची आणखी वाट पाहावी लागणार आहे.
  • सामनासुरु होण्यापूर्वीच पुन्हा पावसाचा व्यत्यय

IND W vs SA W Final – अंतिम सामन्यावर पावसाचे सावट; नवी मुंबईच्या आकाशात काळ्या कुट्ट ढगांची गर्दी, जोरदार पावसाला सुरुवात

हरमनप्रीत आणि जेमिमासाठी क्रिकेटप्रेमींचा खास संदेश…

  • अंतिम सामन्यावर पावसाचे सावट; नवी मुंबईच्या आकाशात काळया कुट्ट आभाळाची गर्दी, जोरदार पावसाला सुरुवात 

तरूणांना लाजवणारा आजींचा उत्साह! टीम इंडियाच्या सपोर्टसाठी आजी थेट मैदानात