
- चांदीचे दागिने काळे पडणे हे सामान्य आहे. कारण ते हवेतील सल्फर आणि आर्द्रतेमुळे होते. त्यांना स्वच्छ करण्यासाठी काही घरगुती उपाय करता येतील. तुम्ही बेकिंग सोडा आणि पाणी यांची पेस्ट दागिन्यांवर लावा व 15-20 मिनिटे तशीच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.
- लिंबाच्या रसामध्ये मीठ मिसळून त्याची पेस्ट बनवा आणि दागिन्यांवर लावा. काही मिनिटांनी स्वच्छ धुवा. व्हिनेगर आणि गरम पाणी एकत्र करा व त्यात दागिने काही वेळ बुडवून ठेवा. नंतर स्वच्छ धुवा आणि मऊ कापडाने पुसून घ्या. चांदीचे दागिने खूप जुने असल्यास किंवा त्यांची चमक पूर्णपणे गेली असल्यास ज्वेलर्सकडून पॉलिश करून घ्या.



























































